मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १६०

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६० 

नको रे मना वाद हा खेदकारी ।

नको रे मना भेद नाना विकारी ।

नको रे मना सीकऊ पूढिलांसी ।

अहंभाव जो राहिला तूजपासीं ।।१६०।।

अर्थ : हे मना, ज्याने दुःख होईल असा वाद घालू नकोस. हे मना, ज्यामुळे आपापसात अंतर वाढेल आणि नाना प्रकारचे वाईट विकार निर्माण होतील असा भेद निर्माण करू नकोस. तुझ्याजवळ अहंकार असल्याने समोरच्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस. 

( वाद - निष्फळ चर्चा, खेदकारी - दुःखदायक, भेद - आपसातील मतभेद, नाना विकारी - वाईट विकार/मनोवृत्ती निर्माण करणारा, पूढिलांसि - समोरच्या व्यक्तींना )

विवेचन 

अहंकार हा मोठा दुर्गुण आहे. त्यामुळे काय घडू शकते ते समर्थ आधीच्या श्लोकाप्रमाणे यातही सांगत आहेत. ' तुटे वाद तो संवाद हितकारी ' असे समर्थ म्हणतात. वाद संपून जिथे संवाद सुरू होतो ती खरी चर्चा. अन्यथा तो केवळ कोरडा आणि निष्फळ वाद. वादामुळे आपापसात अंतर पडते. कारण वादात जो तो स्वतःला आपण श्रेष्ठ कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या दुःखाचे मूळ अहंकार आहे. कारण अहंकार दुसऱ्याचे ऐकून घ्यायला तयार नसतो. मी म्हणतो तेच बरोबर अशी अहंकारी माणसाची भूमिका असते. मला सर्व माहीत आहे ही त्याची मनोभूमिका इतरांना दुखावणारी ठरते. इतर लोक माझ्यापुढे तुच्छ आहेत असे त्याला वाटू लागते. 

स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याच्या प्रयत्नात तो इतरांना दुखावतो. त्यातून आपापसातील अंतर वाढत जाते. मग इतरांना कसे हरवता येईल या वृत्तीतून त्याच्या मनात नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. त्यातून तो वाटेल थराला जाण्यासही कमी करत नाही. व्यवहारात याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. आपल्या घरात सुद्धा अशा प्रकारचा अनुभव येतो. काही माणसे मी म्हणेल तीच पूर्व या स्वभावाची असतात. दुसऱ्यांच्या मतांचा आदर किंवा त्यांच्या अडचणींचा विचार त्यांच्याजवळ नसतो. त्यातून घरातील सदस्यांची मने दुखावली जातात. मग पुढे ही भांडणे कोणत्या थराला जातील याचा नेम नसतो. 

अहंकारी व्यक्ती कोणालाच आवडत नाही. खरी ज्ञानी माणसे नम्र असतात. फळभाराने झाड वाकते तसा ज्ञानी माणूस ज्ञानाने अधिक नम्र होत जातो. ज्ञानी माणसाला आपल्या अज्ञानाची आणि मर्यादांची जाणीव असते. म्हणून तो नम्र असतो. अहंकार हा बोचणारा असतो. अहंकाराचा स्पर्श काटेरी असतो. नम्रतेचा स्पर्श एखाद्या रेशमासारखा मुलायम असतो. अशा ज्ञानी आणि नम्र माणसांनी काही सांगितले तर समोरची माणसे ते आदरपूर्वक ग्रहण करतात. 

पण अहंकारी माणूस आपल्या अहंकारामुळे दुसऱ्यांना काही सांगण्याची पात्रता गमावून बसतो. तसा त्याला काही नैतिक अधिकारही असत नाही. कारण त्याचे वागणे-बोलणे याचे अनुकरण करून इतरही तसेच अहंकारी होण्याची शक्यता असते. म्हणून समर्थ म्हणतात अहंकारी माणसाने दुसऱ्याला शिकवू नये. अहंकारी व्यक्तीने आधी स्वतःला शिकवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करावा.  स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. मगच लोक त्याचे ऐकतील. नाहीतर ' लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ' या म्हणीप्रमाणे त्याची अवस्था होईल.      

स्वसंवाद 

१. घरात किंवा समाजात मी स्वतःचे मत लादण्यासाठी वाद घालतो, की नाते जपण्यासाठी सामंजस्याने 'हितकारी संवाद' साधतो?

२. फळभाराने वाकणाऱ्या वृक्षाप्रमाणे, माझ्या ज्ञान आणि अनुभवामुळे माझ्यात खरी 'नम्रता' येत आहे की नकळत अहंकार वाढतो आहे?

३. "मी म्हणेन तीच पूर्व दिशा" या वृत्तीने मी माझ्या घरातील किंवा संपर्कातील माणसांची मने तर दुखावत नाही ना?

४. दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी आणि शिकवण्याआधी, मी माझ्या स्वतःच्या आचरणातील दोष आणि अहंकार दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१७/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...