मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १५८

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५८ 

श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रें ।

स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे ।

स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे ।

मना सर्व जाणीव सांडून राहे ।।१५८।।

अर्थ : स्मृती, श्रुती, न्यायदर्शन, मीमांसा करणारी शास्त्रे, तर्कशास्त्र आणि नाना प्रकारचे वेदांत सांगणारे ग्रंथ विपुल आहेत. ( परंतु जेव्हा परमात्म्याचे वर्णन करण्याचा प्रसंग आला तेव्हा ) शेष देखील मौन होऊन स्वस्थ बसला. म्हणून हे मना , जरा जाणतेपणाचा अभिमान सोडून त्या परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न कर. 

( श्रुती - वेद आणि उपनिषदे, न्याय - न्यायदर्शन हे महर्षी गौतम यांनी रचलेले तर्कशास्त्र आणि ज्ञानमीमांसा यावरील दर्शनशास्त्र, विचित्रे - समजण्यास कठीण/नाना प्रकारची , मौनावला - शांत झाला, जाणीव - देहबुद्धी/ज्ञानाचा अहंकार/मीपणा  )

विवेचन 

विविध धर्मशास्त्रे आणि अध्यात्म शास्त्रांच्या मर्यादा समर्थांनी या ठिकाणी स्पष्ट केल्या आहेत. समर्थांच्या काळात आणि त्यापूर्वी वेद, उपनिषदे, न्यायदर्शन, तर्कशास्त्र, मीमांसा शास्त्र आणि ज्यांना स्मृती -श्रुती म्हटले जाते असे ग्रंथ विद्वान मंडळींमध्ये प्रचलित होते. अनेक विद्वान आयुष्यभर या ग्रंथांचा अभ्यास करीत असत. त्यातून आपल्याला आता संपूर्ण ज्ञान झाले आहे असा त्यांचा समज होई. अभ्यासामुळे त्यांना वाक्पटुत्व प्राप्त होई. गावोगावी शास्त्री-पंडितांशी वाद करून त्यांना वादविवादात जिंकणे यात ते धन्यता मानत. अर्थात एखादया व्यक्तीसाठी सर्वच शास्त्रांचा अभ्यास करणे ही अवघड गोष्ट होती. पण समजा एखाद्याने तो केला आणि त्यात प्राविण्य मिळवले तरी परमात्म्याचे दर्शन होणे अशक्यच ! कारण जिथे ज्ञानाची जाणीव तिथे अहंकार आला. 

ईश्वराबद्दलचे शाब्दिक ज्ञान या मंडळींना भरपूर होते. पण शाब्दिक ज्ञानाच्या पलीकडे ईश्वर आहे. शाब्दिक ज्ञान हा देहबुद्धीचाच एक भाग झाला. या सगळ्या शास्त्रांमध्ये देखील एक प्रकारचा समन्वय असतो. पण वरवर अध्ययन करणाऱ्याला तो लक्षात येत नाही. त्यासाठी समन्वय लक्षात आणून देणारा गुरू लागतो. अन्यथा अशा विविध शास्त्रांचे अध्ययन करून गोंधळाची स्थिती निर्माण होते. परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीने या अध्ययनाचा काही उपयोग होत नाही. या धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राच्या मर्यादा समर्थांनी स्पष्ट केल्या आहेत. 

शेषनाग हा परमेश्वराचा अंश मानला जातो. त्याला सहस्त्र मुखे असल्याचे मानले जाते. पण असा हा शेष देखील परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन करताना मौन झाला आणि विष्णूची शय्या बनून स्थिर झाला. शेषनागाची जिथे ही अवस्था तिथे आपल्यासारख्यांची काय कथा ! येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वर उल्लेख केलेले सर्व ग्रंथ किंवा शास्त्रे परमेश्वराचे शाब्दिक वर्णन करतात. त्यावरून एखाद्या व्यक्तीला परमार्थ मार्गाकडे वळण्याची तीव्र इच्छा देखील होऊ शकते. पण जोपर्यंत अशी व्यक्ती साधनेच्या मार्गावर वाटचाल करीत नाही आणि आपला अहंकार आणि देहबुद्धी सोडून देत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होणे अशक्य आहे हेच समर्थांना या ठिकाणी सांगायचे आहे. 

स्वसंवाद 

१. मी केवळ धार्मिक पुस्तके, शास्त्रे किंवा तात्त्विक ग्रंथांचे 'शाब्दिक ज्ञान' मिळवून स्वतःला जाणता समजण्याच्या अहंकारात तर वावरत नाही ना?

२. सहस्र मुखे असलेल्या शेषनागालाही जिथे मौन धारण करावे लागले, त्या अथांग परब्रह्मापुढे मी नतमस्तक होऊन माझे 'मीपण' विरघळवण्याचा प्रयत्न करतो का?

३. विविध शास्त्रांच्या आणि ग्रंथांच्या वादात न अडकता, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली खरा समन्वय साधून मी प्रत्यक्ष साधनेकडे वळतो का?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, देहबुद्धी आणि जाणतेपणाची खोटी जाणीव बाजूला सारून (सर्व जाणीव सांडून) ईश्वरी तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी मी मनाला शांत करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१६/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...