मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १४५

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४५

सदा वीषयो चिंतितां जीव जाला ।

अहंभाव अज्ञान जन्मासि आला ।

विवेकें सदा सस्वरूपी भरावे ।

जिवा ऊगमी  जन्म नाही स्वभावे ।।१४५।।

अर्थ : विषयांचे चिंतन केल्यामुळेच आपल्याला जन्म प्राप्त होतो. अज्ञान आणि अहंभाव सोबत घेऊनच जन्म होतो. या प्राप्त झालेल्या जीवाला विवेकाच्या साहाय्याने स्वस्वरुपी लीन करावे. स्वस्वरूपच आपले उगमस्थान आहे. तेथे जन्माचा संबंध नाही. 

( विषय - इच्छा/वासना, सस्वरूप - आपले आत्मस्वरूप, ऊगमी -परमात्म स्वरूपाशी )

विवेचन 

मनुष्य सदैव विषयाचे चिंतन करीत असतो. त्यातून वासना निर्माण होतात आणि त्यांच्यामुळे आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. एकनाथ महाराज म्हणतात," जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेचि झाली अंगे हरिरूप " या सृष्टीमध्ये दोन विषय असतात. एक म्हणजे आत्मविषय. दुसरा म्हणजे अनात्मविषय. अनात्मविषय म्हणजे  स्वस्वरूप किंवा परमेश्वर सोडून बाकीच्या गोष्टी. म्हणूनच त्यांचा उल्लेख विषय असा केला जातो. विषयातून वासना निर्माण होतात. 

मनुष्य जन्मतो तोच मुळी विषय सोबत घेऊन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अज्ञान आणि अहंकार सोबत घेऊनच आपण येतो. त्यामुळे देहबुद्धी बलवान असते. देहबुद्धीमुळे दृश्य जगत सत्य वाटू लागते. आपल्या शरीरात चार प्रकारची शरीरे किंवा देह वास करतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. त्यातच पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांचा समावेश होतो. सूक्ष्म शरीर हे वासनात्मक असून त्यात मन, बुद्धी, अहंकार इ. गोष्टी राहतात. कारण देह म्हणजे जीवाचे आत्मस्वरूपाविषयीचे अज्ञान. जीवाला आत्मस्वरूपाचा होणारा बोध अर्थात ' सोहं ' म्हणजे तो मीच आहे. ही जाणीव म्हणजे महाकारण देह. सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून विषय चिंतन होऊन मनुष्याला जन्म प्राप्त होतो. 

जोपर्यंत आपण आपले मूळ स्वरूप जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात असेच अडकत राहणार. नदी जशी उगमापाशी शुद्ध असते, तसे आपले मूळ स्वरूप शुद्ध असते. तिथे विषय विकारांची घाण नसते. वासनांचे तरंग तिथे उमटत नाहीत. ते नसल्यामुळे आपण त्या परमात्म तत्त्वाशी एकरूप झालेलो असतो. तिथे फक्त आनंदाचे साम्राज्य असते. जन्म मृत्यूचा प्रश्नच येत नाही. 

म्हणूनच आपल्याला जर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचे असेल तर आत्मस्वरूपाचे चिंतन करा असे समर्थ सांगतात. एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात, " हरी मुखे गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे । त्यासाठी विषयाचे चिंतन सोडून परमेश्वराचे चिंतन करणे, त्याचा ध्यास घेणे हाच एकमेव उपाय आहे. असे करता करता एक दिवस त्याची अनुभूती नक्की येईल. समर्थांसह सर्व संतांनी हाच उपदेश आपल्याला केला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या. "देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहणे म्हणजे सर्वस्व विसरून तो क्षण त्याच्याच स्मरणात जगणे, त्याच्याशी एकरूप होऊन जाणे. 

स्वसंवाद 

१. माझा दिवसभर व्यतीत होणारा वेळ नश्वर अशा 'अनात्म विषयांच्या' चिंतनात जातो, की मी काही वेळ तरी 'स्वस्वरूपाचे आणि ईश्वराचे' चिंतन करतो?

२. मी माझ्या स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या (वासना, अहंकार, वासनात्मक इच्छा) प्रभावात इतका अडकलो आहे का, की ज्यामुळे मला माझ्या मूळ आत्मस्वरूपाचा (सोहं) विसर पडला आहे?

३. नदीच्या उगमाप्रमाणे माझे मूळ स्वरूप अत्यंत शुद्ध आणि आनंदमय आहे हे ओळखून, मी विश्वातील विकारांची घाण मनावर न साचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?

४. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे, सर्वस्व विसरून रोज काही क्षण का होईना ईश्वराशी एकरूप होऊन 'देवाचिये द्वारी' उभे राहण्याची साधना मी करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३१/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...