मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ११९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११९ 

अजामेळ पापी तया अंत आला ।

कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ।

अनाथासि आधार हा चक्रपाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११९।।

अर्थ : अजामेळ या पापी व्यक्तीचा अंत जवळ आला तेव्हा अत्यंत कृपाळूपणाने भगवंताने त्याला मुक्त केले. भगवंत अनाथ व्यक्तींचा नाथ असून तो त्यांचे रक्षण करतो. आपल्या भक्तांचा देव अभिमानी असून त्यांची कधीही उपेक्षा होऊ देत नाही. 

( चक्रपाणी - हातात चक्र धारण केलेला /भगवंत )

विवेचन 

आधीच्या ९५ व्या श्लोकात देखील अजामेळाचा उल्लेख आला आहे. नामस्मरणाचा महिमा स्पष्ट करताना समर्थ पुन्हा अजामेळाचे उदाहरण देतात. अजामेळ हा चरित्रहीन, पापी माणूस होता. विवाहबाह्य संबंधातून त्याला अनौरस संतती झाली होती. त्यातील त्याच्या धाकट्या मुलाचे नाव नारायण होते. हा नारायण त्याचा विशेष लाडका होता. अजामेळाने आयुष्यभर भगवंताचे नाम घेतले नाही. आता त्याचा अंत जवळ आला होता. अशा प्रसंगी त्याचा लाडका पुत्र नारायण जवळ नव्हता. त्याची आठवण येऊन त्याने ' नारायण, नारायण ' हाका मारायला सुरुवात केली. त्याचा मृत्यू समीप आल्याने त्याचे प्राण हरण करण्यासाठी यमदूत आले. परंतु त्याचवेळी तो नारायणाचे नाव घेत असल्याने विष्णुदूत देखील त्या ठिकाणी आले. 

विष्णुदूत आल्याचे पाहून यमदूत परत गेले. आपण केवळ योगायोगाने का होईना पण भगवंताचे नाम घेतले. परंतु त्या नामाचा एवढा महिमा पाहून अजामेळाला आपल्या आतापर्यंतच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. भगवंताच्या नामाशिवाय आपण व्यर्थ जीवन घालवले असा बोध त्याला या प्रसंगावरून झाला. तो तेव्हापासून भगवंताची भक्ती करू लागला. आणि आपल्या अंतकाळी भगवन्नामाने उद्धरून गेला. 

भगवंत हा अनाथांचा नाथ आहे. जे असहाय आहेत, ज्यांना कोणी नाही अशांचा तो आधार आहे. तो त्यांचे रक्षण करतो. तो आपल्या भक्तांचा कैवारी आहे. 

या श्लोकातून नामस्मरणाचा महिमा सांगतानाच समर्थांनी हे स्पष्ट केले आहे की केवळ अंतकाळी नाम घेतल्याने कोणी उद्धरून जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याने आयुष्यात कधीच भगवंताचे नाम घेतले नाही, त्याच्या मुखात अंतकाळी भगवंताचे नाम येण्याची सुतराम शक्यता नाही. तेव्हा आपण आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेऊ आणि उद्धरून जाऊ असे जर कोणाला वाटत असेल तर त्यात काही अर्थ नाही. पेरलेच नाही तर उगवणार कसे ? 

जशी सज्जनांना आणि भगवंताच्या भक्तांना त्याची कृपा प्राप्त होते, तसाच त्याच्या कृपेचा अधिकार दुर्जनांना देखील असतो. परंतु हे केवळ तेव्हाच घडते जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. आणि जेव्हा ती व्यक्ती आर्ततेने भगवंताचे नाम घेऊ लागते तेव्हाच भगवंत येऊन अशा व्यक्तींचा उद्धार करतो. 

स्वसंवाद 

१. मी केवळ संकटाच्या वेळी किंवा आयुष्याच्या शेवटी भगवंताचे नाम घेण्याची वाट पाहत आहे, की आजपासूनच जाणीवपूर्वक नामस्मरण करत आहे? 

२. अजामेळाप्रमाणे माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, तर 'पश्चात्ताप' होऊन  स्वतःला सुधारण्याची आणि भक्तीमार्गावर चालण्याची तयारी मी ठेवली आहे का? 

३. "देव अनाथांचा नाथ आहे आणि भक्ताभिमानी आहे" यावर विश्वास ठेवून, मी संसारात स्वतःला एकटे किंवा असहाय्य समजून निराश होणे सोडले आहे का? 

४. माझे देवाचे नाम घेणे केवळ यांत्रिक आहे, की त्यात अजामेळाला शेवटी जी जाणवली ती 'आर्तता' आणि भगवंतप्राप्तीची ओढ आहे?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

६/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...