मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १२८

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२८ 

मना वासना वासुदेवी वसो दे ।

मना कामना कामसंगी नसो दे ।

मना कल्पना वाउगी ते न कीजे ।

मना सज्जना सज्जनीं वस्ती कीजे ।।१२८।।

अर्थ : हे मना, तुझी वासना एका वासुदेवाप्रतीच असू दे. कामवासना तृप्त करणाऱ्या गोष्टीत माझी वासना नसू दे. कामना पूर्ण करण्यासाठी निराधार गोष्टींची कल्पना करीत बसू नको. हे सज्जन मना, यासाठी तू संतांचा सहवास कर.

( कामसंगी - कामवासना तृप्त करणाऱ्या गोष्टी, वाउगी - निराधार/निरर्थक )

विवेचन 

आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला धन्य कोणाला म्हणावे ते सांगितले. या श्लोकात ती धन्यता जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर काय करायला हवे ते समर्थ सांगतात. आपण संसारी आणि व्यवहारी माणसे. हे जग आणि संसार खरा मानून आपण चालतो. त्या जगात सुख मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या वासना निर्माण होतात. वासना म्हणजे इच्छा. माणूस आहे तिथे वासना असणारच. पण समर्थ म्हणतात की वासना जर करायचीच असेल तर ती वासुदेवाची का नको ? कामना ही कधीही चांगल्या गोष्टीची असावी. ती चांगली गोष्ट म्हणजे परमेश्वर. या श्लोकात समर्थांनी 'रामाची ' असा शब्द न वापरता ' वासुदेवाची ' असा शब्द वापरला. खरं तर श्रीराम हे समर्थांचं उपास्य दैवत. पण समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यांच्यात भेद नाही. एकाच परमेश्वराची ती रूपे आहेत. रामाचे भक्त श्रेष्ठ आणि कृष्णाचे भक्त कनिष्ठ असा फरक करता येत नाही. भगवंताची नावे आणि रूपे भिन्न भिन्न असली तरी तो भगवंत एकच आहे. जो भगवंताचा खरा भक्त असतो, तो परमेश्वरात असा भेदभाव करीत नाही. " राम कृष्ण हरी " या मंत्राचा वारकरी मोठ्या भक्तीभावाने जप करतात. यात राम आणि कृष्ण ही दोन्ही दैवते सामावली आहेत. तेव्हा आपल्याला जर काही प्राप्त करण्याची वासना असेल तर ती भगवंत प्राप्तीची का असू नये ? म्हणून समर्थ म्हणतात की वासना असलीच तर वासुदेवाची असावी.

या श्लोकात समर्थांनी वासना, कामना, कल्पना असे तीन शब्द वापरले आहेत. आधी कल्पना निर्माण होते .एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे म्हणजे वासना. कामना ही हवेनकोपणाला आसक्तीचे रूप देते. म्हणून समर्थ म्हणतात की हे मना ,तुझी वासना ,तुझे हवे नको पण वासुदेवाकडे असू देत  कामभावना ठेवू नकोस .तू कल्पना कर पण वेडीवाकडी करू नकोस. कल्पना, कामना, वासना चांगल्या ठेव .त्यासाठी सज्जन संगतीत तू रहा .तर पवित्र विचारामुळे तुझ्या विचारात बदल होईल ,

परंतु आपली देहबुद्धी प्रबळ असल्यामुळे देहाच्या सुखासाठी आपल्या मनात नाना प्रकारच्या वासना वास करीत असतात. त्या वासनापूर्तीसाठी मन नाना प्रकारच्या कल्पनांत रमत असते. मला यामुळे सुख मिळेल, त्यासाठी असे करू या वगैरे वगैरे. मनोराज्यात रमणाऱ्या शेखचिल्लीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अशा प्रकारे कल्पना करीत राहणे याला समर्थांनी ' वाउगे ' हा शब्द वापरला आहे. म्हणजे निराधार किंवा वास्तवाशी फारकत घेतलेल्या गोष्टी. तेव्हा समर्थ म्हणतात,' हे मना अशा वाउग्या गोष्टीत रमू नकोस.' त्यांनी म्हटल्याप्रमाणे 'सदा सर्वदा प्रीती रामी धरावी.' तेच आपल्या हिताचे आहे. 

पण हे सगळे साध्य करण्यासाठी समर्थ आपल्याला सज्जनांचा सहवास करायला हवा असे सांगतात. इथे पुन्हा ' सज्जन ' म्हणजे व्यवहारातील चांगली माणसे किंवा जीवनात यशस्वी झालेली माणसे असा अर्थ नसून सज्जन म्हणजे साधुसंत. तेच आपल्याला खरे समाधान कशात आहे ते सांगतील. आपल्या ज्या जन्मजात वासना आहेत, त्या भगवंताकडे कशा वळवाव्या याचे मार्गदर्शन करतील. जसे विचारांना वळण लावावे लागते, तसे वासनांना देखील चांगल्या मार्गाने जाण्यासाठी एक प्रकारचे वळण लावावे लागते. साधुसंत आपल्या वासनांना तसे वळण लावण्यास मदत करतात. आज समाजातील भोंदू बाबांचा भरलेला बाजार पाहून असे मार्गदर्शन कोण करील ? कोणत्या साधुसंताकडे जावे असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पण त्यासाठी संतांचे ग्रंथ आणि त्यातून त्यांनी केलेला उपदेश यांचे पालन करणे म्हणजे एक प्रकारे संतांचा सहवासच आहे. नित्य ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकाराम गाथा  किंवा भगवद्गीता यासारखे ग्रंथ आपल्या वाचनात त्यासाठी असावेत. 

स्वसंवाद 

१. माझ्या मनातील 'वासना' केवळ ऐहिक सुख आणि 'कामना' पूर्ण करण्यासाठीच धडपडत आहे, की मी तिला चांगल्या मार्गावर (वासुदेवाकडे) वळवण्याचा प्रयत्न करत आहे? 

२. शेखचिल्लीप्रमाणे मी केवळ 'असे झाले तर तसे होईल' अशा निराधार आणि 'वाउग्या' कल्पनेत माझा बहुमूल्य वेळ तर वाया घालवत नाही ना? 

३. भगवंताच्या वेगवेगळ्या नावांत किंवा रूपांत (राम-कृष्ण इ.) मी माझ्या मर्यादित बुद्धीने व्यर्थ भेदभाव तर करत नाही ना? 

४. आजच्या भोंदू बाबांच्या दांभिक बाजारात न अडकता, मी खऱ्या 'सज्जनांचा सहवास' मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा तुकाराम गाथा यांसारख्या ग्रंथांचे नित्य वाचन करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१३/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...