मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १४१

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४१

म्हणे दास सायास त्याचे करावे ।

जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।

गुरु अंजनेवीण तें आकळेना ।

जुने ठेवणें मीपणें आकळेना ।।१४१।।

अर्थ : आत्मसाक्षात्कार झालेल्या संताच्या चरणी लीन व्हावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्याची सेवा करावी. कारण सद्गुरूंनी दिव्य दृष्टी दिल्याखेरीज आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे शक्य नाही. परंतु आपल्या देहबुद्धी किंवा अहंकारामुळे आत्मस्वरूपाचा अक्षय असा ठेवा आपल्याला कळत नाही.

( दास - समर्थ रामदास स्वामी, सायास - प्रयत्नपूर्वक सेवा, जाणता - आत्मसाक्षात्कार झालेली व्यक्ती /संत, अंजन - डोळ्यात घालावयाचे काजळ /येथे अर्थ दिव्य दृष्टी )

विवेचन 

आपला धर्म, परंपरा, इतिहास, वेद, शास्त्रे, पुराणे या सर्व गोष्टी म्हणजे सुद्धा समर्थांच्या भाषेत सांगायचे तर 'जुने ठेवणें ' म्हणजे अक्षय सुखाचा ठेवा आहे. त्यामुळे जीवन जगण्यासाठीचे मार्गदर्शन आणि ऊर्जा आपल्याला मिळते. परंतु या सर्व गोष्टी प्रयत्नपूर्वक शिकाव्या लागतात. त्यासाठी सायास म्हणजे प्रयत्न करावे लागतात. अनेक गोष्टी गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय समजत नाही. पदोपदी अडचणी येतात. गुरुची मदत, मार्गदर्शन लागते. अध्यात्मातही आपल्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे अंतिम उद्दिष्ट असते. तोच अक्षय सुखाचा ठेवा असतो. खरं तर तो आपल्याजवळच असतो. परंतु आपली देहबुद्धी प्रबळ असल्याने आपल्या आत्मस्वरूप त्याने झाकोळले जाते. शिवाय आपल्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार असतो. मला सर्व कळते अशा प्रकारची भावना माणसाच्या मनात निर्माण होते. तात्पर्य क्षणिक सुखाच्या मागे लागलेला माणूस चिरंतन अशा आत्मस्वरूपाच्या सुखापासून दूर जातो. 

यावर एकच प्रभावी उपाय आहे. समर्थ म्हणतात यासाठी आत्मसाक्षात्कार झालेल्या संताच्या चरणी लीन व्हावे. प्रयत्नपूर्वक त्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यावे. त्यांच्या सेवेत आपला ज्ञानाचा अहंकार गळून पडतो. देहबुद्धी कमी होऊ लागते. संतांच्या कृपेशिवाय आत्मदर्शन होणे शक्य नाही. पण एकदा त्यांची कृपा झाली की काही मिळवायचे बाकी राहत नाही. 

पूर्वीच्या काळी जेव्हा बँकांची सोय उपलब्ध नव्हती, तेव्हा सुरक्षिततेसाठी धन कोठेतरी लपवून ठेवावे लागे. मग लोक जमिनीत कुठेतरी धन पुरून ठेवत. परंतु बऱ्याच वेळा कोणाला न सांगितल्यामुळे हा धनाचा मौल्यवान ठेवा जमिनीत तसाच पुरलेला राहत असे. मग जमिनीत ठेवलेले धन आपल्याला दिसावे म्हणून लोक डोळ्यात एक विशिष्ट प्रकारचे अंजन घालत असत. त्यामुळे जमिनीतील धन स्पष्ट दिसू लागे. पण इथे समर्थ ज्या धनाची गोष्ट करीत आहेत ते आत्मज्ञानरूपी धन आहे. त्यासाठी संतकृपेच्या अंजनाची आवश्यकता असते. ज्ञानेश्वर माउली देखील म्हणतात

जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फाटा फुटे । मग वास पाहे तेथे प्रकटे । महानिधी ।।

या ओवीतील महानिधी म्हणजेच आत्मसाक्षात्कार. त्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक असते. त्यांची कृपा नसेल तर सर्व प्रकारचे प्रयत्न अपयशी ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात,' सद्गुरूवाचूनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी ।। 

म्हणून सगळा अहंकार बाजूला ठेवून सद्गुरुचरणी लीन व्हावे. त्यांची सेवा करावी. ' संतकृपा झाली, इमारत फळा आली ' संतकृपेशिवाय परमार्थाच्या इमारतीचा पाया भक्कम होत नाही, इमारत उभीच राहू शकत नाही. आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, गुरुचरणी लीन होतो त्यामागील रहस्य हेच आहे. 

स्वसंवाद 

१. माझ्या अंगी असलेल्या अहंकाराने किंवा देहबुद्धीमुळे मी गुरुंचे/संतांचे मार्गदर्शन घेण्यास कचखाऊपणा करतो का?

२. कठीण विषयांच्या अभ्यासासाठी जशी मार्गदर्शकाची गरज असते, तशी आत्मज्ञानाचा आणि खऱ्या सुखाचा शोध घेण्यासाठी मला सद्गुरूंच्या 'दिव्य दृष्टीची' (गुरु-अंजनाची) गरज वाटते का?

३. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी सर्व अहंकार बाजूला ठेवून सद्गुरूंच्या किंवा संतांच्या विचारांना शरण जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?

४. केवळ वर्षातून एकदा गुरुपौर्णिमा साजरी न करता, संतांनी दाखवलेला सन्मार्ग दररोज माझ्या आचरणात आणण्यासाठी मी काय प्रयत्न करतो?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३०/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...