मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १३१

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३१

भजावा जनीं पाहता राम येकु ।

करी बाण येकु मुखी शब्द येकु ।

क्रिया पाहता उधरे सर्व लोकू ।

धरा जानकीनायकाचा विवेकु ।।१३१।।

अर्थ : समस्त जगामध्ये भक्ती करण्यायोग्य श्रीरामासारखे दुसरे दैवत नाही. एकबाणी आणि एकवचनी असा असलेला हा श्रीराम आहे. त्याच्या चरित्राचे नीट अवलोकन किंवा अनुसरण केले तर सर्व लोकांचा उद्धार होतो. अशा श्रीरामांचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवावा. 

विवेचन 

श्रीरामाच्या गुणांची महती स्पष्ट करणारा हा अतिशय सुंदर श्लोक आहे. श्रीराम हे समर्थांचे उपास्य दैवत. त्या दैवताची महती समर्थ वेगवेगळ्या प्रकारे गात आहेत. श्रीरामाची उपासना किंवा भक्ती जगामध्ये सर्वश्रेष्ठ कशी हे सांगताना समर्थ म्हणतात की तो एकबाणी आहे. एकबाणी या शब्दाचा अर्थ त्याने एकदा धनुष्यावर बाण चढवला की त्याचा नेम चुकत नाही. त्यावरूनच एखादी गोष्ट/एखादा उपाय जर अचूकपणे काम करत असेल तर आपण त्यासाठी ' रामबाण ' हा शब्द वापरतो. परंतु रामाच्या ' एकबाणी ' या विशेषणाचा अर्थ अजून जर व्यापकपणे घ्यायचा तर तो अचूक निर्णय घेणारा आहे. त्याचा निर्णय आणि निश्चय दोन्ही गोष्टी अचूक आणि अपरिवर्तनीय आहेत. 

त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो एकवचनी आहे. एकदा जे शब्द उच्चारले ते खरेच होणार ! एकदा जे वचन दिले ते पाळणार. त्यात कालत्रयीही बदल नाही. रामाचा जन्म ज्या कुळात झाला, त्याची रीतच अशी होती," रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाय पर वचन न जाई," रामाने हे ब्रीद कटाक्षाने पाळले आहे. आपल्या पित्याला दिलेले वचन, आपल्या मित्रांना दिलेले वचन त्याने प्राणांचे मोल देऊनही पाळले आहे. राम वनवासात असताना जेव्हा भरत त्याला परत घेऊन जाण्यासाठी आला तेव्हा प्रजेच्या आग्रहाखातर आलो म्हणून तो पुन्हा राज्यकर्ता होऊ शकला असता. तेव्हा एक राज्यकर्ता म्हणून देखील त्याचे चरित्र आदर्श आहे. " मी असे बोललोच नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता" असे बोलून शब्द फिरवण्याची वेळ त्याच्यावर कधी आली नाही.

 राम एकबाणी, एकवचनी होता तसाच एकपत्नी होता. सीतेवर त्याचे अपरंपार प्रेम होते. त्याने सीतेचा त्याग केला म्हणून त्याच्यावर टीका करणारे लोक ही दुसरी बाजू पाहत नाहीत. सीतेचा त्याग केल्यानंतरही त्याने दुसरा विवाह केला नाही. अश्वमेध यज्ञाच्या वेळी वसिष्ठांनी त्याला अशा वेळी दुसरे लग्न करता येते असे सांगितले होते. त्यावेळी एकापेक्षा अधिक विवाह करण्याची प्रथा होती. दशरथ राजाचेच तीन विवाह झाले होते. तरी देखील रामाने दुसरा विवाह केला नाही. एका सीतेशिवाय तो दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नव्हता. म्हणूनच समर्थ म्हणतात की त्याच्या चरित्राचे अवलोकन करावे. कारण सर्व दृष्टींनी अनुकरण करण्यासाठी रामाचे चरित्र आदर्श आहे. ज्यांनी ज्यांनी रामाची भक्ती केली, त्यांचा उद्धार झाला.

शेवटच्या ओळीत समर्थ धरा ' जानकीनायकाचा विवेकु ' असे आपल्याला सांगतात. रामाचा विवेक घेणे म्हणजे आदर्श म्हणून रामाची निवड करणे. त्याचा विवेक करणे म्हणजे रामाने जसे बोलण्याप्रमाणे आपले आचरण ठेवले तसे आपणही ठेवावे. केवळ त्याचे चरित्र वाचणे, गुणगान करणे, त्याची परमेश्वर म्हणून पूजा करणे यापेक्षाही त्याच्या गुणांची पूजा बांधणे, ते गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. 

स्वसंवाद 

१. श्रीरामांप्रमाणे मी 'एकवचनी' आहे का? मी दिलेला शब्द किंवा घेतलेला निर्णय प्रामाणिकपणे पाळतो, की स्वार्थासाठी "माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता" असे म्हणून सोयीस्करपणे शब्द फिरवतो? 

२. आजच्या अस्थिर आणि प्रलोभनांनी भरलेल्या जगात, माझ्या जोडीदाराप्रती माझा नितांत आदर आणि 'एकपत्नी / एकनिष्ठ' असण्याचे व्रत अबाधित आहे का? 

३. श्रीरामांनी 'एकबाणी' राहून जसे आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडले, तशी अचूकता आणि कामावरची निष्ठा माझ्या कृतीत कधी दिसते का? 

४. मी केवळ देवघरात रामाची पूजा करण्यातच धन्यता मानतो, की 'जानकीनायकाचा विवेक' धारण करून त्यांचे सद्गुण माझ्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१५/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...