फुलले ऋतू
मंद मंद पवन गात
वसंत गीत ये भरात
सांग कुठे आहेस तू
फुलले ऋतू फुलले ऋतू.
बगळ्यांची माळ अंबरी
कोकिळेची मधु ललकारी
धुंद गंध मोहराचा लागला सुटू
फुलले ऋतू फुलले ऋतू
निसर्गात या जादू घडे
पीत पानांचे भूमी सडे
वृक्षांना स्वप्न हरित लागले दिसू
फुलले ऋतू फुलले ऋतू
फुलली ही माळराने
फुलली ही उपवने
अवनीवर रंग फुलांचे लागले दिसू
फुलले ऋतू फुलले ऋतू
धुंद अशा वातावरणी
नवचैतन्य येई धरणी
मनी मानसी असशी तू
फुलले ऋतू फुलले ऋतू.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा