उगवतीचे रंग
कावळ्यांची शाळा
रंग काळा काळा काळा
कावळ्यांची भरली शाळा
कावळे गुरुजी हुशार फार
गोष्टी सांगती युक्तीच्या चार
म्हणे करू नका फार
काव काव काव
कावळे जातीचे खराब होईल नाव
गुरुजी म्हणाले बाळांनो
आता निसर्ग राहिला थोडा
माणसाला देऊ आपण
पर्यावरण रक्षणाचा धडा
स्वच्छतेवर झाली
शाळेमध्ये चर्चा
गावोगावी साऱ्या
नेऊ आपण मोर्चा
नाही ऐकले माणसाने
तर जाऊ आपण पळून
जंगलातच राहू मग
आपण सारे मिळून
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/११/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा