मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग 

माणसं तशी चांगली असतात... 


माणसं तशी चांगली असतात 

थोडीफार वांगली असतात.  

परवा माझ्या घराजवळून जाताना 

दोन माणसं बोलत होती 

ती कोणाबद्दल बोलत होती 

त्याला कोणता संदर्भ होता 

 काहीच नव्हते मला ठाऊक. 

एक जण दुसऱ्याला सांगत होता 

' बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले 

मी त्याला म्हटले तुला काही हवे का ? ' 

एवढेच शब्द माझ्या कानावर पडले 

मी म्हटले खरेच आहे 

दुसऱ्याचे अश्रू यांना दिसतात कारण 

माणसे तशी चांगली असतात. ।। १ ।।


जगात वाईट वागणाऱ्यांची कमी नाही 

तसे चांगले वागणारेही थोडे नाहीत 

खरी गोष्ट एवढीच असते की 

वाईट वागणाऱ्या माणसांनाही 

त्यांचे वागणे मनातून खटकते 

पण असला विचार ते दडपून टाकतात 

नाहीतर माणसे तशी चांगली असतात. ।। २ ।। 


महाभारतात श्रीकृष्णाने दुर्योधनाला 

न्याय काय अन्याय काय खूप समजावले होते 

दुर्योधनाला ते पटलेही होते 

तो म्हणाला तू म्हणतोस ते पटते 

पण मला तसे करण्याची बुद्धीच होत नाही. 

स्वार्थामुळे त्यांचे निर्णय बदलत असतात 

नाहीतर माणसं तशी चांगली असतात. ।। ३ ।। 


धृतराष्ट्राला नेत्रहीन असेलही   

भल्याबुऱ्याची जाण होती. 

सगळ्या चांगल्या गोष्टी कळत असतात 

आपल्या निर्णयाचे परिणामही दिसत असतात. 

स्वार्थापोटी सगळ्या गोष्टी घडतात 

मनातून त्यालाही पांडव प्रिय असतात  

कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ४ ।। 


सीतेला पळवून नेताना रावणालाही 

आपल्या पापाची जाण होती 

आपल्या अंतरातील आवाज 

परस्रीची अभिलाषा वाईट हे ही त्याला ठावे होते 

सगळे माहीत असूनही माणसे वाईट गोष्टी करतात 

पण अंतरात कुठेतरी बोचणारे सल असतात कारण 

माणसे तशी चांगली असतात. 

भ्रष्टाचार करणाऱ्यांना सुद्धा 

भ्रष्टाचार वाईट हे कळत असते. 

कधी तरी पकडले जाऊ 

भीती मनाला खात असते 

देवधर्म, दानधर्म मग करतात 

कारण माणसे तशी वाईट नसतात. 

प्रत्येकाच्या मनात दुर्योधन असतो 

तसा युधिष्ठिरही असतो 

राम असतो तसाच रावणही असतो. 

वाईट गोष्टी तेव्हाच घडतात 

जेव्हा मनातल्या दुर्योधनाचे रावणाचे गुण 

युधिष्ठिरापेक्षा, रामापेक्षा जास्त भरतात. 

नाहीतर माणसे तशी चांगली असतात. 

कोणाचे ऐकायचे कोणाचे नाही 

सांगतो नेहमी आतला आवाज 

वाईट गोष्टींचे एक मात्र असते 

दिसायला ती सुंदर दिसते 

सुंदर स्त्रीचे रूप घेऊन 

भुलविणाऱ्या राक्षशिणीसारखी 

ती तुम्हाला मोहात पाडते. 

चांगल्या गोष्टी नसतीलही आकर्षक 

कारण त्या वेष बदलून येत नाहीत 

त्या करायला थोडे कष्ट पडतात 

पण देतात खात्री 

सुखी समाधानी आयुष्याची, शांत निद्रेची 

श्रेयस आणि प्रेयस यातील त्याच गोष्टी 

श्रेयस असतात बाकीच्या साऱ्या प्रेयस असतात. 

माझा माणसांवर विश्वास आहे कारण 

माणसे तशी चांगली असतात. 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...