उगवतीचे रंग
ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग दोन
कालच्या लेखात आपण ध्येय निश्चिती करण्यापूर्वी स्वतःच्या प्रतिमेचे एकदा अवलोकन करावं असं पाहिलं होतं . त्यासाठी चिनी माणसं तीन स्तरावर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण, परीक्षण करतात हे ही आपण पाहिलं. त्यातील पहिला स्तर म्हणजे मी स्वतःला काय समजतो. दुसरा स्तर म्हणजे लोक मला काय समजतात ? आणि तिसरा स्तर म्हणजे आरसा . म्हणजे सत्य परिस्थिती. कारण तुम्ही काय आहात हे सत्य आरसा तुम्हाला लक्खपणे दाखवतो. इथे आरसा म्हणजे आपले मन. ते आपल्याला स्वतःबद्दल सत्य काय आहे ते सांगते. या तीन स्तरांमधला पहिला स्तर अत्यंत महत्वाचा. कारण तुम्ही स्वतःला काय समजता, त्यावर खूप काही अवलंबून आहे. तुम्ही स्वतःला जे काही समजाल, तसे तुम्ही व्हाल.
आता आजच्या विषयाकडे वळू या. एकदा हे आपलं परीक्षण आपण केलं की मग पुढची वाट आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आपल्याला नेमके काय करावे लागेल, हे समजते. मग स्वतःबद्दल फाजील अहंकार किंवा न्यूनगंड सुद्धा असल्यास निघून जायला मदत होते. ध्येयनिश्चितीच्या मार्गावर वाटचाल करताना आपण सुरुवातीला एकाग्रता म्हणजे काय आणि ती कशी करायची हे पाहू. एकाग्रता म्हणजे जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. सचिन तेंडुलकर म्हणतो, ' मी जेव्हा क्रिकेट खेळतो, तेव्हा माझे सारे लक्ष फक्त क्रिकेटवरच असते. ' ही झाली तन्मयता किंवा एकाग्रता.
एकाग्रता करताना नको असलेल्या गोष्टी टाळून, हव्या असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. आपण एखादी माहिती शोधण्याकरीता गुगलवर सर्च करतो. ती सर्च करण्याकरता आपण आपल्याला जी माहिती हवी, ते नाव गुगल सर्चवर टाकतो. गुगल मग आपल्याला हवी ती माहिती आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो. हे करताना तो बाकीची माहिती गाळून आपण सर्च केला तेवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो. ही गाळणी जशी गुगल लावतो, तशीच गाळणी आपल्या मेंदूजवळ असते. आपल्या मेंदूची क्षमता अफाट असते. तो सुद्धा आपल्याला हवी ती माहिती पुरवतो. किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी मदत करतो. उदा. अशी कल्पना करा, की आपण टीव्ही वर बातम्या पाहतो आहोत. सध्या सगळ्या बातम्या जवळजवळ कोरोनाबद्दलच आहेत. या गावात इतक्या लोकांना लागण, इतके बळी वगैरे माहितीचा किंवा बातम्यांचा पाऊस आपल्यावर आदळत असतो. पण आपल्याला हवी असते एखादी विशिष्ट बातमी. मग आपला मेंदू काय करतो, की इतर सुरु असलेल्या भाराभर बातम्यांकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्याला हवी असलेली बातमी टीव्हीवर सांगितली जाते, तेव्हा तो अचूक लक्ष देतो. म्हणजे आपल्याला हवी असलेली बातमी इतर बिगर महत्वाच्या बातम्या गाळून तो आपल्यापर्यंत पोहोचवतो. मात्र त्याचवेळी जर आपल्याला कोणी विचारले की अरे आता त्या मंत्र्यांचे काय स्टेटमेंट दाखवले ? तेव्हा आपण म्हणतो, ' अरे , माझे तिकडे लक्षच नव्हते. माझे अमुक एका बातमीकडे लक्ष होते. ' ही आहे आपल्या मेंदूची ताकद.
ही मेंदूची ताकद किंवा शक्ती आपल्याला आणखी वाढवता येऊ शकते. त्यासाठी खूप सुंदर आणि सोपे मार्ग आहेत. आपण थोडा वेळ शांत बसावं. आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं. सुरुवातीला वेगवेगळे विचार मनात गर्दी करतील. पण आपल्याला त्या विचारांच्या मागे जायचं नाही. आपलं लक्ष फक्त श्वासावर. हळूहळू येणारे विचार कमी होतील. एक वेळ अशी येईल की मन काही काळासाठी का होईना पण निर्विचार होईल. आणि मग आपल्याला खूप शांत आणि प्रसन्न वाटेल. रोज थोडा थोडा वेळ यासाठी देऊन ही वेळ वाढवता येईल. काही दिवस फक्त पाच मिनिटांचा सराव करा.
दुसराही एक छान मार्ग आहे. जर तुम्ही योगासनं करत असाल, तर योगासनांच्या शेवटी शवासन न चुकता अवश्य करा. शवासन करताना आपण आपले सगळे अवयव क्रमाक्रमाने शिथील करतो. सुरुवातीला पायापासून वेगवेगळ्या अवयवांवर लक्ष केंद्रित करतो. आणि मग लक्ष फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर. हळूहळू श्वासाची गती अगदी मंद होते. तीही आपल्या लक्षात येते. आणि अगदी पाचदहा मिनिटांसाठी शवासन केलं तरी छान शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळते आणि आपल्याला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. हाच अनुभव योगनिद्रा करताना सुद्धा येतो. आपल्याला योगनिद्रा कशी घ्यायची हे जर माहित नसेल, तर एखाद्या अनुभवी योग शिक्षकाकडून आपण ती जाणून घेऊ शकता.
हे झाले काही मनाला ताजेतवाने करण्याचे आणि एकाग्रता वाढवण्याचे उपाय. या एकाग्रतेचा उपयोग आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी करून घ्यायचा आहे. उदा तुम्ही चित्र काढत असाल, एखादं वाद्य वाजवत असाल, किंवा अजून दुसरा काही तुमचा छंद असेल, त्यासाठी रोज नियमाने थोडा वेळ द्या. तुम्हाला गाण्याची आवड असेल तर गाण्याचा रियाज करता येईल. रोजचा सराव तुम्हाला त्यात अधिकाधिक परिपूर्णतेकडे घेऊन जाईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या गोष्टी तुमच्या आयुष्याला आकार देतील. तुमचं जीवन बदलवून टाकतील. तुम्ही काय करायचं ठरवता, त्यावर ते अवलंबून आहे.
परवा एक छोटासा व्हिडीओ मी पाहिला. त्यात एक कुंभार एक चिलीम घडवत असतो. पण त्याची पत्नी म्हणते, ' अहो, चिलीम काय बनवता ? माठ बनवा. आता उन्हाळा येतो आहे. माठ खूप खपतील . ' कुंभार म्हणतो की ठीक आहे. तो ती माती काढून आणखी दुसरी माती त्यात मिसळतो आणि आपल्या त्या चाकावर तिला माठाचा आकार देऊ लागतो. तेव्हा माती म्हणते की तू आधी तर दुसरेच काही बनवत होतास आणि आता माठ बनवतो आहेस. तेव्हा कुंभार म्हणतो, ' बरोबर आहे. पण मी माझा विचार बदलला. ' तेव्हा मातीतून आवाज येतो, ' तुझा तर फक्त विचारच बदलला, पण माझे तर जीवनच बदलून गेले. चिलीम होऊन मी तापले असते. पण आता माठ होईन. स्वतः गार राहीन आणि लोकांना पण गार पाणी देऊन त्यांची तहान भागवेन . ' तेव्हा विचार बदला . आयुष्य बदलेल.
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
५/५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२

Khup chan as ujwal. Khup Chan margdarshan milale. Aabhar Sir🙏
उत्तर द्याहटवा