उगवतीचे रंग
बाजी जिंकून देणारी माणसं ...
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं येतात की जी आपल्याला साहाय्यभूत ठरतात. प्रत्येकाचे आयुष्य ही एक प्रकारची परीक्षाच असते. अनेक संकटे आपल्या धैर्याची आणि सहनशक्तीची परीक्षा पहात असतात. अशा वेळी काही माणसे आपल्या मदतीला धावून येतात. त्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात काही करणं शक्य होतं . अशी साहाय्यभूत होणारी माणसं आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात.
खूप माणसं अशी असतात की जे इतरांनी त्यांच्यासाठी केलेलं योगदान नाकारतात. हे यश, कीर्ती, पैसा हे फक्त मी आणि माझ्या जीवावर कमावले आहे असा गर्व त्यांना असतो. पण वस्तुस्थिती कधीच अशी नसते. कोणतीही एकटी व्यक्ती समाजामध्ये फक्त स्वतःच्या जीवावर प्रगती करू शकत नाही. पण अर्थात त्यांनी वस्तुस्थिती नाकारल्याने परिस्थिती बदलत नाही. पण काळ ही गोष्ट अशी आहे की एक दिवस अशा माणसांना तो त्यांची जागा दाखवून देतोच. रावणासारख्या त्रिलोक विजयाची घमेंड मिरवणाऱ्या माणसाची देखील काळ आला की वाताहत होते.
आयुष्य म्हणजे नेहमी चांगल्या आणि वाईटात चाललेला संघर्ष असतो. आपण नेहमी असं म्हणतो की धर्माच्या बाजूने, सत्याच्या बाजूने चालणाऱ्यांचा नेहमीच विजय होतो. या अर्थाची सुभाषितंही आहेत. ' यतो धर्मस्ततो जय : ' हे खरे असले तरी धर्माच्या बाजूने किंवा सत्याच्या बाजूने चाललेली लढाई ही तेवढी सोपी नसते. या ठिकाणी धर्म हा शब्द जीवन जगण्याची पद्धत किंवा आपली नीतिमूल्ये पाळणे या अर्थाने आहे. तो रूढ धार्मिक अर्थाने नाही. तर ही लढाई कधी कधी सहनशक्तीचा खूप अंत पाहणारी असते, निराश करणारीही असते. पण अशाही परिस्थितीत जे आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवतात आणि शेवटपर्यंत परिस्थितीशी न थकता दोन हात करतात, ते विजयी होतात.
मी म्हटल्याप्रमाणे ही लढाई सोपी नसते. पण ही जिंकण्यासाठी काही माणसे निश्चितच आपल्याला मदत करतात. त्यांच्या साहाय्याने हे युद्ध आपण जिंकू शकतो. आपण सध्या जे रामायण आणि महाभारत धारावाहिक पाहतो आहोत, त्यात असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतील. त्यातील पुनरावृत्तीचा दोष माझ्याकडे घेऊन सुद्धा मी त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे.
प्रसंग एक
रावण सीतेला पळवून नेतो. राम लक्ष्मण आणि सुग्रीवासहित सगळी सेना तिचा शोध घेते. सगळे हतबल होतात. मी वर म्हटल्याप्रमाणे राम हा सत्याच्या, न्यायाच्या मार्गाने चालणारा आहे. पण तरीही या ठिकाणी सीता शोधात त्याला हनुमानाचे मोलाचे साहाय्य होते. अन्यथा तिचा शोध लागणे कठीण होते.
प्रसंग दोन
राम लक्ष्मणाला इंद्रजित नागास्त्र सोडून मूर्च्छित करतो. हे संकट त्यांच्या जीवावरच बेतलेले असते. अशा वेळी हनुमान गरुडाला घेऊन येतो आणि त्यांना त्या नागपाशातून मुक्त करतो.
प्रसंग तीन
लक्ष्मणाला इंद्रजित शक्तीअस्त्र सोडून मूर्च्छित करतो. त्याचेही प्राण संकटात असतात. यावेळी रामासह सगळे हतबल होऊन बसलेले असताना, हनुमंताचे सुषेण वैद्याला घेऊन येणे आणि नंतर त्याच्या सल्ल्याप्रमाणे द्रोणागिरीवरील औषधी वनस्पती आणण्याकरिता जाणे. तो पर्वतच उचलून आणणे.
या सारख्या अनेक प्रसंगात हनुमंत हा रामाला बाजी जिंकून देणारा ठरला आहे. रामाला बाजी जिंकून देणारी दुसरी व्यक्ती आहे. बिभीषण. बिभीषण रामरावण युद्धाच्या वेळी अनेक गोपनीय आणि महत्वाच्या गोष्टी रामलक्ष्मणाला सांगतो. त्यामुळेच त्यांना युद्धात विजय मिळवणे सोपे होते. अशीच मदत सुग्रीव, नल, नील, जांबुवंत यांची सुद्धा आहे.
अशाच पद्धतीने महाभारतात देखील पांडव हे धर्माने आणि न्यायाने चालणारे आहेत. पण त्यांना बाजी जिंकून देणारी व्यक्ती आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण वेळोवेळी त्यांना मोलाचा सल्ला देतो आणि मार्गदर्शन करतो. जसा रावण आणि त्याचे पुत्र शक्तिशाली असतात तसेच कौरव आणि त्यांच्या बाजूने लढणारे पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मंडळी असतात. शिवाय कर्णासारखा अत्यंत धुरंधर योद्धा त्यांच्या बाजूने असतो. अशा वेळी त्यांच्यावर विजय मिळवणे कठीणच झाले असते. पण इथे त्यांना ही बाजी जिंकून देणारा कृष्ण आहे. अर्जुन जेव्हा युद्धाच्या वेळी हतबल होतो, धैर्य गाळून हताशपणे बसतो, तेव्हा त्याच्यातील वीरवृत्तीला, क्षात्रवृत्तीला आणि सद्सद्विवेकबुद्धीला जागृत करण्याचे काम श्रीकृष्ण गीता सांगून करतो. आणि नंतर अर्जुन लढायला प्रवृत्त होतो. पांडव युद्ध जिंकतात.
आजही नावं कदाचित वेगळी असतील पण रावण, दुर्योधन यासारख्या दुष्ट प्रवृत्ती आपल्यासमोर उभ्या ठाकतात. अशा व्यक्तींना प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली असते. अशा व्यक्तींशी तुम्ही आम्ही एकटे लढू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढावे लागते. काही शत्रू दृश्य असतात आणि काही शत्रू अदृश्य. दृश्य शत्रूंशी लढणे एक वेळ सोपे असते. पण अदृश्य शक्तींशी लढण्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते. संयम, धैर्य, चिकाटी, सहनशीलता आदींचा यावेळी शस्त्र म्हणून उपयोग होतो. काही वेळा जवळचेच लोक आपले छुपे शत्रू असू शकतात. तर काही वेळा आपल्याच अंतरातील काम, क्रोध, मत्सर, असूया हेही आपले शत्रू असतात. अशा वेळी अर्जुनही आपणच असतो आणि कृष्णही आपणच. आपल्या धैर्याची अशा वेळी परीक्षा होते. अशा प्रसंगी आपल्याला बळ देण्यासाठी चांगले विचार, चांगले ग्रंथ, सदगुरू मार्गदर्शन करतात. मात्र अशा वेळी निराश न होता आपल्या सत्य आणि धर्माच्या मार्गावर वाटचाल सुरु ठेवायची असते.
कल्पना करा की हनुमान, बिभीषण, सुग्रीव आदी मंडळी यांनी रामाला मदत केली नसती तर ? सत्याच्या मार्गावर चालणारा राम युद्ध जिंकला असता ? श्रीकृष्णाची मदत नसती तर धर्म आणि न्यायाच्या बाजूने चालणारे पांडव जिंकले असते ? नक्कीच जिंकले असते. पण ते जिंकणे त्यांच्यासाठी तेवढे सोपे राहिले नसते. त्यांना ती बाजी जिंकून देण्यात ही सगळी मंडळी मोलाचे साहाय्य करणारी ठरली. यात आपल्याला असेही म्हणता येते की जेव्हा तुमची बाजू न्यायाची, सत्याची असते, तेव्हा अशा शक्ती तुम्हाला साहाय्यभूत होण्यासाठी उभ्या ठाकतात.
आपण तर सर्वसामान्य माणसे. आपले आयुष्य म्हणजे एक लढाईच असते. या लढाईत आपल्याला पण आयुष्याची बाजी जिंकून देणारी माणसं भेटतात. कधी ती आईवडिलांच्या रूपात असतात, कधी भाऊ , बहीण नातेवाईक आणि मित्रांच्या रूपात असतात, कधी सद्गुरुंच्या रूपात असतात. आपल्याकडे ती दृष्टी मात्र पाहिजे. त्यांना ओळखता आले पाहिजे. आपले यश हे आपल्या एकट्याचे कधीच नसते. या सगळी व्यक्तींना जेव्हा आपण आपल्या यशात सहभागी करून घेऊ, तेव्हाच आपले यश शोभून दिसते. अशा व्यक्तींच्या बद्दल राखणे, कृतज्ञ राहणे आणि प्रसंगी त्यांचे उपकार स्मरून त्यांच्या उपयोगी पडणे हे आपले कर्तव्य असते.
आपल्यालाही दुसऱ्यांच्या आयुष्यात अशी बाजी जिंकून देणाऱ्या माणसांची भूमिका बजावता येईल का ? तसे आपण करू शकलो तर, त्यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही. कधी कधी आपला थोडासा मदतीचा हात, आपले दुसऱ्याला धीर देणारे दोन मोलाचे शब्द हे दुसऱ्या माणसांसाठी खूप महत्वाचे ठरू शकतात.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

Khup Khup sundar sat ya ani vastv vadi lekh. Khup Aabhar Sir🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद. आपले नाव समजेल का ?
उत्तर द्याहटवा