उगवतीचे रंग
थंडा करके खाओ ...
आपलं जीवन म्हणजे सुखदुःखाच्या क्षणांनी व्यापलेला एक मोठा चित्रपटच असतो. त्या चित्रपटातले प्रमुख पात्र म्हणजे आपण स्वतः आणि मग आपल्या सहवासात जे जे लोक येतील ते ते सहकलाकार असतात. खरं तर कोणताही चित्रपट हे एक प्रकारचे सांघिक कार्य म्हणजेच टीम वर्क असते. त्याच्या यशातला किंवा अपयशातला वाटा हा कोणा एकाचा नसतो. पण आयुष्याचा चित्रपट आणि पडद्यावरचा चित्रपट यात एक फरक असतो. पडद्यावरचा चित्रपट यशस्वी किंवा अयशस्वी होवो, दोष सगळ्या टीमकडे जातो. पण आयुष्याच्या चित्रपटाचे असे नाही. यशस्वी झाला तर यश सर्वांचे असते. आणि अपयश आले तर त्याचे धनी मात्र आपण असतो.
असं का होतं ? तर जन्मल्यापासूनच आपण परावलंबी असतो. अगदी जन्मल्यापासून ते नोकरीला लागेपर्यंत आणि उर्वरित आयुष्यातही आपल्याला सगळ्यांचे सहकार्य लागते. आपण फक्त आपल्या स्वतःच्या जीवावर मोठे होत नसतो. म्हणून यशात समाजाचाही वाटा असतो. पण अपयशात मात्र दोष आपल्याकडेच येतो. त्याचे कारण असे आहे की आपल्या आयुष्याच्या चित्रपटाचे हिरो जसे आपण असतो, तसेच दिग्दर्शकही असतो. आणि दिग्दर्शकावर खूप काही अवलंबून असते. तो जशी दिशा देईल, तसा चित्रपट बनतो.
या आपल्या आयुष्याच्या चित्रपटात आपली भूमिका फार महत्वाची असते. समोर येणाऱ्या प्रसंगांना आपण कशी प्रतिक्रिया देतो हे खूप महत्वाचे असते. उदा. बॉसने तुम्हाला एखादे जास्तीचे काम सांगितले, आणि तुम्ही ते न चिडता केले तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण होते. पण काही लोक भडकू असतात. म्हणजे ते लगेच चिडतात. आणि चिडून प्रतिक्रिया देतात. ते प्रसंगी बॉसला सांगायला कमी करत नाहीत, ' ऑफिसची वेळ संपली आहे. मी काम करणार नाही. ' असे दोनचार प्रसंग घडले की बॉसला तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. आणि त्यामुळे तुमच्याबद्दल प्रतिकूल प्रतिमा त्याच्या मनात तयार होते. त्यामुळे बॉसने तुम्हाला एखादे जास्तीचे काम सांगितले, तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. ते स्वीकारा . फार तर तुमचा एखादा तास जास्त जाईल. पण तो तुमच्याबद्दल चांगली प्रतिमा निर्माण करील. आणि कदाचित पुढे येणाऱ्या तुमच्या फायद्याचे किंवा यशाचे बीज त्यामुळे रोवले जाईल.
आता यात काही लोक असेही निश्चित म्हणतील की मी माझे काम प्रामाणिकपणे करतो. मग जास्तीचे काम मी का करावे ? आणि प्रत्येक वेळी बॉस मलाच का सांगतो ? ऑफिसात इतर लोक नाहीत का ? हे प्रश्न बरोबरच आहेत. पण कधी कधी होते असे की इतर लोकांपेक्षा तुम्ही बॉसला चांगले वाटता . म्हणूनही तो तुम्हाला सांगत असतो. याचा अर्थ असा नाही की तो सांगेल ते प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे. कधी कधी योग्य शब्दात वेळ पाहून तुम्ही ती जाणीव त्याला करून देऊ शकता. पण लगेच अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया देणे टाळा. म्हणजेच काही वेळ जाऊ द्या. वेट अँड वॉच. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ' थंडा करके खाओ. '
मी असे खूप लोक पाहिले आहेत की जे लगेच प्रतिक्रिया देतात. आणि असेही पाहिले आहेत की जे विचलित होत नाहीत. योग्य वेळी प्रतिक्रिया देतात. असे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. कधी कधी आपले नातेवाईक, मित्रमंडळी आपल्याला काही सल्ला देऊ इच्छितात. कधी कधी तुम्ही त्यांच्याकडून एखादी अपेक्षा केलेली असते की जी ते वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. अशा वेळी वर म्हटल्याप्रमाणे जी भडकू माणसे असतात, ती लगेच चिडून त्यांना वाटेल ते बोलायला कमी करत नाहीत. पण त्यांचीही काही अडचण असू शकते. आपण प्रत्येक वेळी त्यांना गृहीत धरू शकत नाही. पण आपल्या बोलण्यामुळे ती मंडळी मात्र कायमची दुखावली जातात. नात्यात दुरावा निर्माण होतो.
आता थोडे वेगळे उदाहरण घेऊ. समजा आपण एखाद्या महत्वाच्या मुलाखतीसाठी निघालो आहोत. आणि रस्त्यात आपली गाडी अचानक बंद पडली. जवळपास कुठेही मेकॅनिक किंवा गॅरेज नाही. तुम्हाला तर वेळेवर पोहोचायचे आहे. नाही पोहोचलो तर इंटरव्ह्यूच्या रूपाने आलेली संधी हातून निघून जाईल. अशा वेळी आपण प्रचंड अस्वस्थ होतो. आणि मग स्वतःलाच दोष देऊ लागतो. घरून निघतानाच गाडी व्यवस्थित आहे की नाही हे आपण का पाहिले नाही. आता माझ्या हाती आलेली हीही संधी जाणार. नेमके माझ्याच बाबतीत असे का होते असे लाख विचार आपल्या मनात येतात आणि जे महत्वाचे करायचे ते राहून जाते. आपण परिस्थितीवर लगेच प्रतिक्रिया देण्यात ( रिऍक्ट होण्यात ) फार घाई करतो आणि बऱ्याच वेळा तिथेच आपले चुकते. अशा वेळी चिडून किंवा परिस्थितीला दोष देऊन उपयोग नसतो. तर डोके शांत ठेवूनच निर्णय घ्यावा लागतो.
अशा वेळी तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणी तुम्ही फोन करून तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ते कळवू शकतात. गाडी रस्त्याच्या कडेला किंवा कुठे तरी लावून दुसऱ्या एखाद्या वाहनाने मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचता येईल का याचा अंदाज घेऊ शकता. अगदी टोकाचा विचार केला तर तुम्हाला दिलेली मुलाखतीची वेळ निघून जाईल आणि तुमच्या नोकरीची संधी जाऊ शकते. एवढेच होईल. पण त्याने काही जगबुडी होत नाही. आपण व्यवस्थित राहिलो तर अशा संधी पुढे पुष्कळ चालून येतील. म्हणून प्राप्त परिस्थिती स्वीकारणे आणि त्यात आपले मनोधैर्य टिकवून ठेवणे हे महत्वाचे आहे.
हे दोन प्रसंग मी उदाहरणादाखल सांगितले. खरं तर आयुष्य म्हणजे प्रचंड गुंतागुंतीचा चित्रपट असतो. त्यात येणारी संकटे, काही वेळा येणारे प्रचंड दुःख हे आपल्या संयमाची आणि धैर्याची परीक्षा घेणारे असते . पण खूप माणसे साध्या साध्या गोष्टींनी विचलित होतात. लगेच रिऍक्ट होतात. आणि स्वतःचेच नुकसान करून बसतात. मग अशा वेळी आयुष्याच्या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी आपल्यावरच येते. ' जिंदगी इम्तिहान लेती है. ' त्यात ' जो जिता वही सिकंदर. '
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
९४०३७४९९३

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा