मुख्य सामग्रीवर वगळा

किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार...

उगवतीचे रंग

 किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार...

आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. दररोजचे जीवन तर आपण जगतच असतो. तेच तेच रुटीन . हे जीवन जगत असताना कोणाच्या चेहऱ्यावर आपण हसू फुलवू शकलो तर ? किती छान होईल !  राज कपूरच्या अनाडी चित्रपटात एक गाणं आहे. फार सुंदर... अभिनय करतानाचा  त्याचा तो भोळा, हसतमुख आणि निरागस चेहरा आपल्या मनाची पकड घेतो.

किसी के मुस्कुराहटोंपे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिलमे प्यार
जिना इसी का नाम है.

माझ्याकडे कधी काही कार्यक्रम असला तर स्वयंपाकासाठी आम्ही एका बाईंना बोलावतो. त्या येतात त्यांचे काम करतात आणि निघून जातात. त्यांना त्यांचे ठरलेले पैसे तर मी देणारच असतो. पण तरीही त्यांचा स्वयंपाक झाल्यावर मी किचनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, " काकू, स्वयंपाक फार छान झाला बरं का आज. " त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमलते. त्यांनी खरे तर याची अपेक्षा केली नसते. मी नसते काही म्हटले तरी त्या आपले काम करून जाणारच होत्या. पण आता जाताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद आणि समाधान होते.

एकदा मी आणि माझा एक मित्र प्रवासादरम्यान एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. त्या चहावाल्याने आम्हाला स्पेशल चहा बनवून दिला. आम्ही पैसे दिले. पण जाता जाता त्या चहावाल्याला म्हटले, " चहा छान बनवला बरं का." त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तो म्हणाला, " तुम्हाला आवडला ना साहेब " आणि गाणं गुणगुणत तो आपल्या कामात गढून गेला.

खरं तर या दोन्ही प्रसंगात मी विशेष काही केले नाही. पण प्रेमाचे दोन शब्द खर्च केले. आपण जर असे ठरवले की रोज मी किमान एका माणसाला तरी आनंदी करीन तर एका वर्षात किमान ३६५ लोकांना आपण आनंदी करु शकू. काही क्षण का होईना पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकू. घरात आपल्या आईने, पत्नीने आपल्यासाठी प्रेमाने, कष्टाने स्वयंपाक केलेला असतो. तिला फक्त म्हणा, " आज स्वयंपाक छान झाला, आज भाजी छान झाली ,"तर तिलाही तिच्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटेल. असे अनेकछोटेमोठे प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. एखाद्या लग्नसमारंभात पाणी पिण्यासाठी, चहा घेण्यासाठी , जेवण घेण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. अशा वेळी आपण आपण पटकन एखाद्याला पाणी , चहा , जेवणासाठीची डिश देऊ शकतो. लिफ्टमध्ये चढताना कोणाला गर्दी असल्यास पुढे जाण्याची संधी देऊ शकतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो.सध्या कोरोनामुळे अनेक गोरगरिबांवर आणि मजुरांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांचा रोजगार कोरोनाने हिरावून घेतला आहे. जवळ पैसा नाही. खायला अन्न नाही. ' जिवलगा, राहिले दूर घर माझे..' अशी परिस्थिती आहे. पण खूप लोक त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना सलाम..!

खरं म्हणजे आपल्यातील बरीच सहृदयी माणसे अशी कामे करीतच असतात. पण आपण ती आजपासून जाणीवपूर्वक करु या. एक सुंदर वाक्य मध्ये वाचनात आले होते, "जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे प्रयत्न करतात, परमेश्वर त्यांच्या जीवनातील आनंद कधी कमी होऊ देत नाही. "

©️ *विश्वास देशपांडे,* *चाळीसगाव .*
       *९४०३७४९९३२*

( *वाचकांना विनंती की,* *लेख शेअर करताना नावासहित करावा. तसेच त्याची ध्वनिफीत ( ऑडिओ ) बनवू नये.)*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...