उगवतीचे रंग
चांदण्या रात्रींचे गारुड ...
चांदण्यांनी भरलेलं आकाश कोणाला मोहवीत नाही ? अगदी लहानथोर कवींपासून ते थोर तत्वज्ञांपर्यंत. वेदमंत्र लिहिणाऱ्या ऋषीमुनींपासून ते ग्रहगोलांचा शोध घेणाऱ्या आजच्या शास्त्रज्ञांपर्यंत. लहानपणी आकाशातला चंद्र पाहून रामाने सुद्धा चंद्र हवा म्हणून हट्ट केला होता. प्रेषित महंमद पैगंबरांना चांदण्या रात्रींनी स्फूर्ती दिली. तर रवींद्रनाथ टागोरांसारखा महाकवी आकाशाखाली आपले देहभान विसरून जायचा. चित्रपट काम करणाऱ्या कलाकारांनाही आपण तारे आणि तारका म्हणतो. आणि लहान मुलांच्या रूपाने हे ' तारे जमीपर ' येतात. म्हणून एखादी आई आपल्या लाडक्याला म्हणते
चंदा है तू मेरा सुरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दर्या उसळला प्रीतीचा
हे नाट्यगीत कोणाचे मन मोहून घेत नाही ? अनेकदा तर प्रियकराला आपल्या प्रेयसीच्या मुखाला चंद्राची उपमा द्यावीशी वाटते. एका जुन्या हिंदी गाण्यात प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो
एक रात मी दो दो चांद खिले
एक घुंघट मे , एक बदली मे
सुरेश भट यांच्या गझल माझ्या फार आवडत्या. त्यांच्या काही गझल आशा भोसलेंनी गायल्या आहेत. त्यांचे सोने झाले आहे.आकाश कधी कोणाला उचलून नेता येईल का ? पण कवीने मनात आणले तर सहज शक्य आहे. ' केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ' ही अशीच एक भटांची अप्रतिम गझल. या गझलेतली एक ओळ मला फार आवडते. ' आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. ' ही ती ओळ. शब्दातलं सौंदर्य बघा. कधी असतं ' आकाश तारकांचं ? तर रात्री. कोण घेऊन येतं तर ती रात्र आपल्यासोबत घेऊन येते. मग हे तारकांनी भरलेले आकाश तीच भल्या पहाटे उचलून घेऊन जाते. किती सुंदर कल्पना. आणि या गझलेतली शेवटची ओळ तर अप्रतिम आहे.

पौर्णिमेचा चंद्र पाहून समुद्राला सुद्धा भरती येते. आणि प्रेमी जनांची प्रीत देखील फुलते. तिला जणू उधाण येतं . बकुळ पंडित यांनी गायिलेलं
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दर्या उसळला प्रीतीचा
हे नाट्यगीत कोणाचे मन मोहून घेत नाही ? अनेकदा तर प्रियकराला आपल्या प्रेयसीच्या मुखाला चंद्राची उपमा द्यावीशी वाटते. एका जुन्या हिंदी गाण्यात प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो
एक रात मी दो दो चांद खिले
एक घुंघट मे , एक बदली मे
सुरेश भट यांच्या गझल माझ्या फार आवडत्या. त्यांच्या काही गझल आशा भोसलेंनी गायल्या आहेत. त्यांचे सोने झाले आहे.आकाश कधी कोणाला उचलून नेता येईल का ? पण कवीने मनात आणले तर सहज शक्य आहे. ' केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ' ही अशीच एक भटांची अप्रतिम गझल. या गझलेतली एक ओळ मला फार आवडते. ' आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. ' ही ती ओळ. शब्दातलं सौंदर्य बघा. कधी असतं ' आकाश तारकांचं ? तर रात्री. कोण घेऊन येतं तर ती रात्र आपल्यासोबत घेऊन येते. मग हे तारकांनी भरलेले आकाश तीच भल्या पहाटे उचलून घेऊन जाते. किती सुंदर कल्पना. आणि या गझलेतली शेवटची ओळ तर अप्रतिम आहे.
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.
ती नक्षत्रांनी भरलेली रात्र एवढी सुंदर आहे, की ती कवीला त्याची शेवटची ओळ सुचवून जाते. अशीच चांदण्यांनी भरलेली रात्र असलेली एक अप्रतिम गझल.
' चांदण्यात फिरताना माझा धरलास हात,
सखया रे आवर ही ,सावर ही चांदरात.
अशा चांदण्या रात्रीत आपल्या संख्याबरोबर, जिवलगाबरोबर फिरण्याची मजा काही वेगळीच.
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊनि कवेत साजणा झुलव मला.
अशी एकामागून एक सुंदर गाणी आठवत जातात. उंबरठा चित्रपटातलं लतादीदींनी असंच गायिलेलं ' चांद मातला , मातला त्याला कशी आवरू ' हे गाणं एक वेगळीच अनुभूती देऊन जातं . चांदण्या रात्रीचा मुलामा जणू आपल्या मनावर देऊन जातं . तर सुधीर फडकेंनी गायिलेल्या चंद्र आहे साक्षीला या गाण्याची खुमारी काही औरच. गाण्याची सुरवातच किती छान होते.
' पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षीला.
तर बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनीच गायिलेलं ' तोच चंद्रमा नभात ' हे गाणं एक वेगळाच मूड जागवत. तोच पौर्णिमेचा चंद्र आहे. तीच चैत्रातली रात्र आहे. पण सगळे जरी तेच असले तरी आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वीची प्रीत हातात राहिली नाही ही खंत कवीला आहे.
म्हणून या गाण्याला थोडी दुःखाची किनार आहे.
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी
अशी ही सगळी अवीट गोडीची गाणी. कितीही ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी.
कलाकार, कवी यांची प्रतिभा नेहमीच आकाशाला गवसणी घालत असते. कविवर्य बा भ बोरकर आकाशाबद्दल फार सुंदर शब्द वापरतात. ते आकाशाला माऊलीच्या रूपात पाहताना म्हणतात

कोर बिलोरी तुझ्या कपाळी , शिरी मोत्यांची जाळी ग
तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी ग
आकाश म्हणजे जणू माऊली . तिच्या कपाळावरची बिलोरी कोर म्हणजे चंद्र. शिरी असलेली मोत्यांची जाळी म्हणजे तारका आणि नक्षत्रे. कायम चंद्र आणि सूर्य यांच्यासारखे तेजस्वी दीप आणि नक्षत्रांचे दिवे. जणू कायम दिवाळीच. किती सुंदर कल्पना. अशा कल्पनांनी कवी अवघे आकाशच आपल्या कवेत घेतो. कुसुमाग्रज आपल्या एका कवितेत पहाट झाली हे किती सुंदर शब्दात सांगतात
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत .
अशा या आकाश आणि चांदण्याच्या रूपाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना युगानुयुगे मोहिनी घातली आहे. आकाशात गेलेल्या अंतराळवीरांना आपला भारत ' सारे जहाँसे अच्छा ' दिसतो. तर सावरकरांची देशभक्ती आकाशातले तारे पाहून उचंबळून येते. आपल्या ' सागरा प्राण तळमळला ' या कवितेत ते म्हणतात
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा
मज भरत भूमीचा तारा.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
9403749932 काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत .
अशा या आकाश आणि चांदण्याच्या रूपाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना युगानुयुगे मोहिनी घातली आहे. आकाशात गेलेल्या अंतराळवीरांना आपला भारत ' सारे जहाँसे अच्छा ' दिसतो. तर सावरकरांची देशभक्ती आकाशातले तारे पाहून उचंबळून येते. आपल्या ' सागरा प्राण तळमळला ' या कवितेत ते म्हणतात
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा
मज भरत भूमीचा तारा.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा