उगवतीचे रंग
आणि बुद्ध हसला...
सध्या करोना व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सहज मनात विचार येतो की हे एखाद्या देशाने विकसित केलेले जैविक अस्त्र तर नसावे ? कदाचित असेल किंवा नसेलही. तसे असले तरी ते बाहेर येणे अवघड आहे. पण भविष्यातील युद्धे ही समोरासमोर लढली जाण्यापेक्षा अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतील. त्याची झलक यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे भौतिक हानी होणार नाही. पण प्राणी, माणसे आणि पर्यावरणाची हानी होऊ शकते. आणि हे युद्ध असे असेल की ते युद्ध आहे हे समजायला वेळ लागेल. तोपर्यंत एखाद्या राष्ट्राची किंवा राष्ट्रांची अपरिमित हानी झालेली असू शकेल. आणि त्या राष्ट्रांवर ताबा मिळवणे शत्रू राष्ट्राला सहजसाध्य होईल.
भविष्यातील युद्धे ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतील. जसे वर उल्लेख केल्याप्रमाणे जैविक युद्ध, एखाद्या देशाला आर्थिक गुलाम बनवून त्याला आपल्या अंकित करणे, पाकिस्तान जसे दहशतवादी घुसवून अनेक वर्षांपासून भारताशी छुपे युद्ध खेळतो आहे तसे युद्ध खेळणे आणि आणखी पुढचा प्रगत पर्याय असेल तो सुपर ह्यूमन्स किंवा सुपर सोल्जर्सच्या माध्यमातून युद्ध करणे. हा शेवटचा पर्याय अमेरिका, चीन किंवा रशिया यासारख्या राष्ट्रांकडून वापरला जाण्याची शक्यता जास्त आहे.
२०१२ मध्ये अमेरिकी लेखक सिमॉन कॉन्वे याची ' रॉक क्रिक पार्क ' या नावाची एक कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीत सुपर ह्यूमन्स किंवा सुपर सोल्जर्सचा उल्लेख आहे. या कादंबरीच्या पुढे अनेक आवृत्या निघाल्या. आणि या कादंबरीत वर्णन केलेल्या सैनिकांच्या वर्णनावर आधारित वेगवेगळे चित्रपट आले. त्यात सोल्जर, युनिव्हर्सल सोल्जर, हल्क, कॅप्टन अमेरिका, घोस्ट इन थे शेल, आयर्न मॅन, एलिझियम यासारखे चित्रपट आहेत. या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी, सैनिक आज आपल्याला काल्पनिक किंवा वैज्ञानिक कथा वाटू शकतात. पण भविष्यात प्रत्यक्षात येणाऱ्या गोष्टींची ही चुणूक आहे असे म्हणायला हरकत नाही.
पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी आपल्याला स्वप्नवत वाटत होत्या, त्या आज प्रत्यक्षात आल्या आहेत. ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जाणारी सुपरसॉनिक विमाने, बुलेट ट्रेन्स, आज माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला आहे. आज रोजच्या जीवनात टीव्ही, मोबाईल फोन्स पासून इतक्या अनेक गोष्टी आपण वापरतो की पूर्वी आपल्याला त्याबद्दल कोणी सांगितले असते तर आपण हसून ती गोष्ट उडवून लावली असती. पण त्या गोष्टी आज आपल्या दैनंदिन वापराचा एक भाग झाला आहेत.
' You cannot create anything out of nothing ' अर्थात शून्यातून आपण कुठलीही निर्मिती करू शकत नाही. त्यासाठी काही ना काही आधार तर असतोच. अमेरिकेतील व्हर्जिनिया आणि इतर प्रांतातील प्रयोगशाळांमध्ये अशा प्रकारचे संशोधन कडेकोट बंदोबस्तात सुरु आहे. त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. वर ज्याचा उल्लेख केला आहे, त्या सिमॉन कॉन्वेला मात्र अशा प्रयोगशाळेत प्रवेश देण्यात आला आणि नंतर त्याची सुप्रसिद्ध ' रॉक क्रिक पार्क ' ही कादंबरी जन्माला आली . सामान्य सैनिकालाच सुपर सोल्जर कसे बनवता येईल यावर त्यांचे संशोधन सुरु आहे. त्यासाठी सामान्य सैनिकाच्या न्यूरल सेल्समध्ये बदल करून म्हणजेच त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेचा ताबा घेऊन त्यावर हुकमत मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी कदाचित त्याचे ब्रेन वॉशिंग करून त्याच्या मेंदूमध्ये एखादी चिप बसवता येईल का ज्यामुळे त्याच्या अनेक क्षमता वाढवता येतील आणि तो आपल्याला हवे तसे वागेल असे प्रयत्न होत आहेत. कोणत्याही देशाला युद्धात आपल्या सैनिकांची हानी होऊ नये असे वाटते. तांत्रिक कारणाने विमान पडले किंवा पाडले तरी चालेल, पण वैमानिक सुरक्षित राहावा अशी आपली इच्छा असते. म्हणूनच पाकिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या वैमानिक अभिनंदनला भारताने याबाबतीत पाकिस्तानशी कोणतीही तडजोड न करता परत आणले.
अशाच पद्धतीने युद्धात सुपर ह्यूमन्स लढतील आणि आपल्या सैनिकांची हानी होणार नाही यासाठी जेनेटिकली एन्हान्सड सैनिक निर्मितीच्या प्रयत्नातही अमेरिका आहे. त्यादृष्टीने त्यांचे संशोधन सुरु आहे. पण या प्रकारचे संशोधन फक्त अमेरिकेतच सुरु आहे असे समजण्याचे कारण नाही. चीनमध्ये या दृष्टीने कधीच प्रयत्न सुरु झाले आहेत. चीनमध्ये गोरिला माकडांमध्ये मानवी मेंदूतील जनुकांचे रोपं करण्यात शाश्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. गोरिलांची ताकद आणि मानवी किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या साहाय्याने चीन गोरिला आर्मी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. रशियामध्ये सुद्धा अशा प्रकारे सुपर सोल्जर्स तयार करण्याबाबत संशोधन सुरु आहे.
अशा रीतीने भविष्यातील युद्धाची दिशा अगदी वेगळी असेल. पण यात फार मोठा धोकाही आहे. हे तंत्रज्ञान मानवावरच उलटण्याचा . त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. नाहीतर माणसाची निर्मिती भस्मासुरासारखी माणसालाच नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. भारताने जेव्हा अणुस्फोट केला, तेव्हाचे सांकेतिक वाक्य होते, ' आणि बुद्ध हसला. ' तो दिवस होता १८ मे १९७४. त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. शिवाय त्याचा दुसरा अर्थ असा की भारताने अणुस्फोटासारखी महाविध्वंसक शक्ती शांततेसाठी आणि विकासासाठी वापरायचे ठरवले होते. आणि जेव्हा जेव्हा शांतीसाठी एखादे कार्य होते, तेव्हा तेव्हा शांतताप्रिय असणारा बुद्ध हसतो. स्मित करतो. भविष्यात निर्माण होणारे हे सुपर ह्यूमन्स किंवा सोल्जर्स मानव जातीच्या विकासासाठी किंवा कल्याणासाठीही वापरता येतील. ज्या दिवशी अशी बुद्धी होईल तो सुदिन. आणि मग पुन्हा बुद्ध हसेल.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा