मुख्य सामग्रीवर वगळा

जास्तीचे देऊन टाका ...

उगवतीचे रंग 

जास्तीचे देऊन टाका ... 

पैसा , रूप, ताकद, बुद्धी  या सारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर मिळणे ही भाग्याचीच गोष्ट. पैशासारख्या काही गोष्टी वारशाने मिळतात. तर काही मिळवाव्या लागतात. रूप किंवा सौंदर्य ही मिळालेली देणगी असते, पण ती टिकवणे आपल्या हातात असते. तशीच ताकदही मिळवावी लागते आणि टिकवावी लागते. पण यातील कुठलीही गोष्ट डोक्यात गेली की मग माणसाला गर्व होतो. त्याची परिणीती दुसऱ्याला तुच्छ लेखण्यात होते. आणि मग अशा अहंकारी माणसाला लोक टाळू लागतात. 

धनवान माणसाचा पैसा जेव्हा सत्कारणी लागतो, तेव्हा समाजासाठी दानशूरतेचा एक आदर्श तो निर्माण करत असतो. टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी असे आदर्श निर्माण केले आहेत. प्रख्यात उद्योगपती घनश्याम दास  बिर्ला यांची एक गोष्ट आहे. एकदा त्यांना कोणीतरी विचारले की तुमचे एवढे उद्योगधंदे आहेत, त्यात भरपूर लोकांना काम मिळते. त्यांच्या पोटापाण्याची सोय होते. ही तुम्ही एक प्रकारची समाजसेवाच करता. मग ठिकठिकाणी प्रचंड पैसा खर्चून तुम्ही मंदिरे का उभारता ? 

या प्रश्नावर बिर्लाजींनी छान उत्तर दिले. ते म्हणाले, " आपल्या देशात हजारो लोक अशिक्षित, अडाणी आणि गरीब लोक आहेत. देवाधर्मावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांना माथा टेकण्यासाठी कुठेतरी  जागा नको का ? परमेश्वरापुढे डोके टेकल्याने जर त्यांना काही समाधान वाटत असेल, तर ते त्यांना मी का देऊ नये ? पण मला वाईट या गोष्टीचे वाटते की मी इतकी सुंदर मंदिरे उभारली, त्यात भगवंताच्या सुंदर मूर्ती उभ्या केल्या , तर त्यांच्याकडे डोळे भरून पाहण्याऐवजी लोक डोळे मिटून भगवंताकडे आपल्या मागण्या करतात आणि नवस करतात. भगवंत दर्शनाचा आनंद घेणारे फार कमी. मागणाऱ्यांचीच गर्दी जास्त. 

पण नंतर बिर्लाजींनी त्या प्रश्न विचारण्यालाच एक प्रश्न विचारला. ' समजा , तू एका नावेतून प्रवास करतो आहेस, आणि त्या नावेच्या तळाला भोक पडले आणि त्या नावेत पाणी शिरू लागले तर काय होईल ? ' 

' ती नाव बुडेल.' 

' मग अशा वेळी तू काय करशील ? ' 

' ती नाव बुडू नये म्हणून जेवढे पाणी बाहेर फेकता येईल तेवढे फेकण्याचा प्रयत्न करेल. ' 

बिर्लाजी म्हणाले, ' पैशाचेही असेच आहे. आवश्यक तेवढा पैसा झाला की जास्तीचा पैसा लोकांना वाटून टाकला पाहिजे. यासाठीच मी मंदिरे उभारतो. समाजसेवेचे प्रकल्प हाती घेतो. आपण समाजाकडून जे घेतो, ते समाजाला परत दिले पाहिजे. जास्तीचा पैसा मुलाबाळांसाठी ठेवला तर ती वाममार्गाला लागण्याची, व्यसनी होण्याची शक्यता असते. साचलेले पाणी आरोग्याला घातक असते. वाहते पाणी आरोग्यदायी असते. ' 

बिर्लाजींचे हे विचार आजही मननीय आहेत. आपण समाजाचे काही तरी देणं लागत असतो. त्यामुळे आपल्याकडे जे काही असते, त्यात समाजाचाही हिस्सा असतोच. तो काही अंशाने तरी परत करता आला पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या पैसा, शक्ती, सौंदर्य, बुद्धी  या गोष्टींचा उपयोग दुसऱ्यासाठी सुद्धा झाला पाहिजे. नावेतील पाण्याचे उदाहरण मोठे छान आहे. नावेतील शिरलेले जास्तीचे पाणी जसे काढून टाकावे लागते, तसेच या सगळ्या गोष्टींचे आहे. त्या असणे ही चांगली गोष्ट. पण 
त्यांची हवा एकदा डोक्यात गेली की मग माणसाचा माणूस राहत नाही. 

प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं मला त्यांच्या वागण्याबद्दल नेहमी कौतुक वाटत आले आहे. अमिताभ सारखी लोकप्रियता क्वचितच कोणा दुसऱ्या नटाच्या वाट्याला आली असेल. त्याला मिळालेला पैसा, लोकप्रियता याची जराही हवा त्यांच्या डोक्यात गेलेली दिसत नाही. पाय जमिनीवर आहेत. आपण त्यांना अनेक सामाजिक कार्यक्रमात किंवा टी व्ही वरील ' कौन बनेगा करोडपती ' सारख्या शो मध्ये पा
हिले आहे. समोरची व्यक्ती कशीही असो, त्या व्यक्तीशी अमिताभ ज्या आदराने बोलतो , ते पाहून खरंच त्याच्याबद्दलचा आदर दुणावतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...