मुख्य सामग्रीवर वगळा

‘ लाभले आम्हास भाग्य...’


    उगवतीचे रंग     

 ‘ लाभले आम्हास भाग्य...

    ‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी..’ असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे. त्यात आपल्या मातृभाषेचा समावेश करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउलींनी तर म्हटलेच आहे-
     माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके
     परी अमृतातेही पैजा जिंके
     ऐसी अक्षरे रसिकेमेळवीन.
    मराठी भाषेतील थोर लेखककवीनाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा होतो. जगाच्या कान्याकोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करतो. मराठीची आठवण करतोमायभूमीची आठवण करतो. ही मराठी माती इतकी पवित्र आहे की कुसुमाग्रज म्हणतात
          माझ्या मराठी मातीचा
          लावा ललाटास टिळा
          हिच्या संगाने जागल्या
          दऱ्याखोऱ्यातील शिळा.
  मराठी भाषेतील अभंग असो वा ओवीतिला सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे.
          रत्नजडीत अभंगओवी अमृताची सखी
          चारी वर्णातुनी फिरेसरस्वतीची पालखी.
    या आमच्या मायमराठीला हजारो वर्षांचा इतिहास आहेया अर्थाने माझी मराठी ऐतिहासिक आहेअक्षर आहेअभिजात आहे. आई जसे आपल्या बालकाचे पालनपोषण करतेतसे या मराठीने तुमचे आमचे पोषण केले आहे. हजारो वर्षांपासून. ते स्तन्य पाजून तिने आपल्याला बळ प्रदान केले आहे. आपले सांस्कृतिक वैभव वाढवले आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळतच आपण मोठे झालो आहोत. मग तिला कसे विसरता येईल...
 माधव ज्युलियन यांच्या शब्दात ांगायचे झाले तर
      मराठी असे आमुची मायबोलीजरी आज ही राजभाषा नसे.
     नसो आज ऐश्वर्य या माऊलीलायशाची पुढे दिव्य आशा असे.
     हिचे पुत्र आम्हीहिचे पांग फेडूवसे आमुच्या हृन्मंदिरी.
     जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापेहिला बैसवू वैभवाच्या शिरी.
ी नैतिक जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आहे. कारण आम्ही तिचे वारस आहोत.
    संस्कृत भाषेतून उगम पावलेलीप्राकृतापासून विकसित झालेली ही मराठी. सातवाहन राजांच्या काळापासून वापरात आलीयादव राजांच्या काळात ती भरभराटीस आली. अनेक संतकवीलेखकांनी तिला सुंदर लेणे चढवले. त्यातून ती अधिकच श्रीमंतऐश्वर्यसंपन्न होत गेली. विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. म्हणून ते आद्य कवी. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील ज्ञान भांडार मराठीत आणून सर्वसामान्यांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरीअमृतानुभवचांगदेवपासष्टीहरिपाठ आदी ग्रंथ लिहून मराठी भाषेला इतके सामर्थ्य प्राप्त करून दिले की खरोखरच ती ‘ अमृतातेही पैजा ‘ जिंकेल. आणि खरोखरीच इतकी सुंदर भाषा त्यांनी वापरली की ओवी असावी तर ज्ञानेशाची असे म्हटले जाऊ लागले. अखिल विश्वासाठी इतके सुंदर पसायदान ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत मागितले की ते मराठीचे एक अभिमानाचे अक्षर आणि अमर लेणे झाले.
    पुढे संत एकनाथसमर्थ रामदाससंत तुकारामसंत नामदेव आदी संतानी नानाविध ग्रंथ लिहून मराठीला आणखी समृद्ध केले. शिवरायांच्या नेतृत्वाखाली ‘ मराठी पाऊल पुढे पडले.’ आणि मायमराठीला राजाश्रय लाभलालोकाश्रय लाभला. मराठी भाषेला मराठी मातीचा गंध लाभला. अंगावर रोमांच उभे करणारे शूरवीरांचे पोवाडे लिहिले गेलेलावण्या लिहिल्या गेल्या. संत कवीपंत कवी यांनी मराठीला समृद्ध केले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकस्वा सावरकरआगरकरम. फुलेन्या. रानडेलोकहितवादीसाने गुरुजीविनोबा भावे आदींच्या साहित्याने मराठी भाषेला अधिक श्रीमंत केले.
    खान्देशच्या मातीत जन्मलेल्या बहिणाबाईबालकवी आदींच्या कवितांनी तर रसिकांच्या मनावर कायमचे गारुड केले. अशिक्षित असलेल्या बहिणाबाई अहिराणीत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेल्यातर बालकवींनी आपल्या कवितांमधून रंगांची आणि निसर्ग सौंदर्याची उधळण केली. आचार्य अत्रेपु ल देशपांडेराम गणेश गडकरीवि वा शिरवाडकरवि स खांडेकरगो नि दांडेकरना सी फडकेमंगेश पाडगावकरबा भ बोरकरभा रा तांबे आदी कवी आणि लेखकांनी अक्षर मराठी साहित्य निर्मिती केली. मराठीतील वाल्मिकी म्हटल्या जाणाऱ्या ग दि माडगुळकर यांनी अक्षर अमर गीतरामायण लिहिले. केवढी थोर साहित्यिकांची मांदियाळी आहे मराठीत ! नावे तरी किती घ्यावीत ! अशा या वेगवेगळ्या कवी आणि लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे.
    तरी आज अशी वेळ का येते की आम्हाला म्हणावे लागते की मराठी भाषा जगवली पाहिजेवाढवली पाहिजे त्याचे कारण आम्ही तिचे पुत्र आहोततिचे वारस आहोततिचे पांग आम्हाला फेडायचे आहेत हे आम्ही कुठेतरी विसरतो. वर्षभरातून एकदा मराठी दिवस आला की आम्हाला मराठीचा अभिमान उरी दाटून येतो. पण पुन्हा वर्षभर गायब ! आमच्या मुलांना आम्ही अट्टाहासाने इंग्रजी शाळेत घालतो. मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा म्हणून शिकणे आजच्या काळासाठी आवश्यक आहेच याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण यासाठी मातृभाषेचा बळी द्यायला हवा का याचा विचार आपण करणार आहोत की नाही मावशीसाठी आईचा बळी द्यायचा का आम्ही आमच्या मुलांना आता ‘ चिऊ काऊ ‘ नाही शिकवत. आमचा काऊ म्हणजे आता गाय. चिऊ म्हणजे sparrow. भू भू म्हणजे कुत्रा नाही. आता डॉगी म्हटले जाते.  ‘ आई ‘ म्हणुनी कोणी आईस हाक मारीती हाक येई कानी. पण ती हाक आता नाही येत कानी. जिकडे तिकडे ‘ मम्मी शब्द कानावर पडतो. इंग्रजीत प्रेताला मम्मी म्हणतात. मम्मी म्हणताना ओठ मिटले जातात तर आई म्हणताना तोंड उघडले जाते. आ होतो. केवढा मोठा फरक ! ‘ टी व्ही वरच्या साबणाच्या एका जाहिरातीत एक छोटी मुलगी आपल्या आईला ‘ मम्मी ‘ म्हणून हाक मारते. आणि मग ‘ किती सुंदर आहे. She is so talented.’ मम्मी सुद्धारॉक स्टार सुद्धा असे इंग्रजाळलेले उद्गार कानी येतात. मोबाईलवर मराठी टाइप करताना मराठीचे जे काही खून पडतात ते तर भयानकच ! ऱ्हस्वदीर्घ तर अजून पुढचा भाग...! त्याबद्दल मी इथे जास्त बोलत नाही.
    म्हणून आमच्या मुलांना आवर्जून मराठी शाळेत टाकले पाहिजेत्यांना सुदर मराठी पुस्तके वाचायला दिली पाहिजेतत्यांची गोडी लावली पाहिजेआधी आपण पालकांनी लावली पाहिजेमराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी बोलामराठी चालामराठी खामराठी प्यामराठी झोपामराठी जागामी मराठीबाणा मराठीजात मराठीपंथ मराठीधर्म मराठी असे अंतर्बाह्य मराठीमय व्हा. आता होळी येते आहे. तेव्हा असा ‘ असा अवघा रंग एक झाला..’ पाहिजे. ती खरी होळी. असे जेव्हा होईल तेव्हा मराठी जगेलवाचेलवाढेल. फक्त मराठी दिन साजरा करून नाही भागणार.
    सुरेश भटांच्या ओळींनी शेवट करू या
          लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
          जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
          धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
          एवढ्या जगात माय मानतो मराठी.
     
                       ©️   विश्वास देशपांडेचाळीसगाव.
                                9403749932

टिप्पण्या

  1. कुणी कुठल्याही भाषिक असो आपण त्याला आपल्या मातृभाषेतून प्रत्युत्तर दिल्यास म्हणजे आपणच आपल्या माय भाषेचा सन्मान ठेवल्यास इतर हीआपल्या भाषेचा अवमान न करता योग्य मान देतील. मराठी घरातून दुरावत चाललेल्या मराठीला जपू या, जगवू या.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...